सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील पुणे- सातारा महामार्गावरील हरिचंद्री (कापूरव्होळ) ता.भोर येथे शनिवार दि.१६ शेतकरी रमेश दत्तात्रय वाल्हेकर ११ वाजता आपली बैलजोडी घेऊन शेतात भात शेतीचा चिखल करण्यासाठी गेले होते.चिखल सुरू असताना शेजारीच असणारी महावितरणची सर्विस केबल शॉर्ट होऊन विद्युत खांबातून शेतातील पाण्यात विद्युत प्रवाह उतरला.यात विजेचा जोरदार धक्का लागून बैल जोडीचा मृत्यू झाला.नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी नाना वाल्हेकर आणि त्यांचे मित्र यांचे प्राण वाचले. मात्र या घटनेमुळे महावितरणचा सावळा गोंधळाचा चव्हाट्यावर आला आहे.
घटनास्थळी तातडीने भाजपा तालुकध्यक्ष जीवन कोंडे ,माजी उपसभापती रोहन बाठे,संगम पाचकाळे, सुनील पांगारे, निलेश कोंडे,राजेश गाडे, रोहन कोंडे, दादा कोंडे,ग्रामस्थ तसेच तलाठी सुधाकर सोनवणे आणि हरिश्चंद्री येथील पोलीस पाटील संपदा चाळेकर ,महावितरणचे कर्मचारी संजय गोरड व प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली.योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्याला शासनातर्फे जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.