भोर ! मोहरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार : दोन करडांना (पिल्ले) पळविले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील गुंजन मावळ खोऱ्यातील मोहरी खुर्द ता. भोर येथील शेतकरी सुरेश सिताराम पांगारकर यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर बुधवारी दि. २९  मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून एक शेळी जागीच ठार केली तर दोन करडू बिबट्याने पळवून नेल्याची घटना  घडली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सागर पांगारकर यांनी सांगितले.
        मोहरी खुर्द परीसरात बिबट्याचा वावर सातत्याने होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची खबर मिळताच वन विभागाचे बाबू तांबे व पंडित गायकवाड हे घटनास्थळी जाऊन पाहणी करुन मृत शेळीचा पंचनामा केला. वनविभागाकडून शेतकरी सुरेश सिताराम पांगारकर यांची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवी अशी मागणी सरपंच सतीश पांगारकर,सदस्य सागर पांगारकर व ग्रामस्थांनी केली आहे. 

To Top