बारामती ! थोपटेवाडीच्या उपसरपंचपदी राणी पानसरे : विरोधी उमेदवाराला अवघी तीन मते

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत थोपटेवाडीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ६ मतांनी  राणी शशिकांत पानसरे यांची निवड झाली. 
         त्यांचे विरोधातील उमेदवार.पृथ्वीराज नलावडे यांना ३ मते मिळाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी काम पाहिले. सरपंच रेखा बनकर, मावळते उपसरपंच .कल्याण गावडे, सदस्य.संतोष खांडेकर,.पृथ्वीराज नलावडे, .लालासो कोरडे.सिमा थोपटे,.कमल थोपटे,.शुभांगी अडागळे ,  .जयवंतराव थोपटे, .नानासो थोपटे, .तुकाराम पानसरे , .प्रमोद पानसरे ,.सचिन वाघ, .जितेंद्र थोपटे, .वसंतराव जाधव, .संतोष जगदाळे, राजेंद्र हरिभाऊ थोपटे, .अभिराज गवळी , .अमोल थोपटे,.अनिल पानसरे, उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाक्याची आतिशबाजी करत आनंद साजरा केला. उपसरपंच.राणी पानसरे यांनी गावच्या विकासासाठी व महिला बचतगट सक्षमीकरण कटिबद्ध रहाणार आहे असे सांगितले.
To Top