धरण क्षेत्रात धुवाधार.....! वीर ४७, गुंजवणी ४१ तर नीरा-देवघर व भाटघर २५ टक्क्यांच्या आसपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 
            यावर्षी मान्सून पावसाने निरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आषाढी पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात २६४ मीमी पावसाची नोंद झाली असून २४.७६ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात ५९८ मीमी पावसाची नोंद झाली असून २२.९७ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १२१ मी मी पावसाची नोंद झाली असून ४६.६९ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात ६८७ मी मी पावसाची नोंद झाली असून ४०.८० टक्के धरण भरले आहे.
To Top