भोर ! पांडेतील ऐतिहासिक विठ्ठल,राही,रुक्मिणी मंदिराला माजी पं.स.उपसभापती रोहन बाठे यांची भेट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती काँग्रेसचे युवा नेतृत्व रोहन दिलीपराव भाठे यांनी आषाढी एकादशी निमित्त तालुक्यातील स्वयंभू ऐतिहासिक पांडे येथील विठ्ठल, राही ,रुक्मिणी मंदिराला कार्यकर्त्यांसमवेत भेट देऊन दर्शन घेतले.
     तळागाळातील जनतेच्या विकासाबरोबरच समाज सेवेचा वसा हाती घेवून काम करणारे माजी उपसभापती रोहन भाटे यांनी राजापूर व टापरेवाडी येथेही विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन महापूजा करीत दर्शन घेतले.यावेळी अविनाश सावंत, पंटी टापरे ,रंगनाथ टापरे, पांडेचे सरपंच सुरेश साळुंखे, तेजस साळुंखे, मोनेश थिटे ,अर्जुन बोबडे, महेश बोबडे ,बाळासाहेब बोबडे उपस्थित होते.बाठे यांनी मागील दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील आठ ते दहा दिंडीतील हजारो वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले.
To Top