बारामती ! आख्ख्या उन्हाळा गेला...! आणि ठेकेदाराला पावसाळ्यात रस्ता सुरू करण्याचा मुड आला......!

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ते मळशी हा अडीच किलोमीटर चा रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराला तब्बल आठ महिन्यानंतर वेळ मिळाला आहे. वास्तविक हा रस्ता पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण होण्याची गरज असताना आता आषाढी पावसात या ठेकेदाराला रस्ता सुरू करण्याचा मूड आला आहे. मात्र पावसाळ्यात होणाऱ्या या रस्त्याला दर्जा मिळणार का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
          वाणेवाडी पासून ते मळशी येथील दिग्विजय जगताप वस्ती पर्यंत रास्ता गेले वर्ष झाला मंजूर झाला आहे. संबधीत ठेकेदाराने सोमेश्वर कारखाना सुरू होण्याआधी डिसेंबर महिन्यापूर्वी रस्ता मोजणी करून संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर मुरूम टाकून ज्या ठिकाणी पाण्याच्या नळ्या असतात त्या ठिकाणी नळ्या टाकण्यात आल्या मात्र तेंव्हापासून आजपर्यंत हा रस्ताच केला गेला नाही. मात्र सद्या गेली आठ दिवस झाले नीरा खोऱ्यात पावसाचा जोर सुरू असताना या ठेकेदाराला ऐन पावसाळ्यात हा रस्ता सुरू करण्याचा मुड आला असून काल पासून ठेकेदाराने रस्ता सुरू केला आहे. मात्र पावसाळ्यात होणारा हा रस्ता टिकणार का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
To Top