सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
माजी आमदार स्व.काशिनाथअण्णा खुटवड यांचा समाजसेवेचा वारसा अखंडपणे चालवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ,गुंजवणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम कशिनाथराव खुटवड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
राजकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जपित कार्यकर्त्यांनी मोहरी ता.भोर येथे वाचनालय सुरू केले. हातवे व तांबड परिसरात खाऊ वाटप करून इस्रम कार्ड नोंदणी तसेच ० ते ५ वयोगटातील चिमुकल्यांचे आधार कार्ड तयार करून देण्यात आले.यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी खुटवड यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.