वाई बिग ब्रेकिंग ! दौलतराव पिसाळ : पसरणी घाटात दरड कोसळली : जीवितहानी टळली

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
गेले चार दिवस सुरु असलेल्या संततधार पावसाने पसरणी घाटात मोठी दरड कोसळली. काल दत्त मंदिरानजीक ही घटणा घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहाणी झाली नाही. मात्र काहिकाळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती वाई पीडल्बुडी कार्यालयाचे कार्यक्षम अधिकारी असलेले उपअभियंता श्रीपाद जाधव यांना समजताच ते जीसीबी आणी कर्मचारी घेऊन तातडीने घटना स्थळावर दाखल झाले. 
               पसरणी घाट व परिसरात गेले चार दिवस धुंवाधार पाऊस सुरु आहर. त्यातच काल आणि आज सुट्टीचा दिवस असल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठि येणारे पर्यटकांच्या वाहणांची गर्दि होत आहे. अशातच घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
             पाचगणी व परिसरात गेली तीन दिवसांपासून पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे डोंगर रांगातून लहान मोठे धबधबे वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी लहान मोठ्या दरडी कोसळत आहेत त्यातच दुपारी पसरणी घाटातील दत्तमंदिरानजिक दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरडीमुळे एकेरी वाहतूक सुरू होती. जे सि बी  ,ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोन तासात  दरड काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला. 
            घटणेची माहिती मिळताच सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी घटणास्थळी दाखल झाले होते. संततधार पावसातही दरड हटविण्याचे काम जिकरीने करुन काही तासातच वाहतुक पुर्ववत सुरु केली. पावसामध्ये पर्यटकांनी घाटामध्ये गाड्या उभ्या करु नयेत असे आवहन यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
To Top