सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने भात शेतीसह ओढ्या-नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. तर वरंधा घाट परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून वारवंड ता.भोर येथील महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर दरड कोसळली असल्याने जाण्याचा मार्ग काही वेळ बंद होता.मात्र ग्रामस्थांनी काहीशा प्रमाणात दरडीतील मोठमोठ्या दगडी बाजूला करून गाड्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केला.
अजूनही काही मोठमोठ्या दगडी या रस्त्यावर घसरलेल्या आहेत.त्या लवकरात लवकर संबंधित विभागाने बाजूला कराव्यात अशी मागणी सरपंच संतोष दिघे,उपलसरपंच लक्ष्मण दिघे, सरपंच शंकर मोरे,शिवाजी दिघे यांनी केली आहे.
--------------
घाट रस्त्यावर प्रवास सावधगिरीने करा
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात चार दिवसांपासून पाऊस जोरदार सुरू आहे . वरंधा घाट रस्ता जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पाऊस जोरदार असल्याकारणाने घाट रस्त्यावर पाणी वाहून येत आहे तसेच छोट्या-मोठ्या दरड कोसळत आहेत.त्यामुळे छोट्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांनी वाहनचालकांनी तसेच प्रवाशांनी घाट रस्त्यावरील सावधगिरीने करावा असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.