सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बकरी ईद व आषाढी एकादशी १० जुलै एकाच दिवशी येत असल्याने भोर मुस्लिम जमात तर्फे मुस्लिम बांधवांनी एकमताने सोमवार दि. ११ जुलै बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे भोरला बकरी ईद एक दिवस उशिरा होणार आहे.याचे निवेदन मुस्लिम जमात भोर यांनी तहसीलदार सचिन पाटील व पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना दिले आहे.
बंधू भाव व भाई चारा संभाळत रविवार दि.१० ईदची नमाज पठण करण्यात येणार असून सोमवार दि.११ बकरी ईदची कुर्बानी करण्याचे ठरले आहे.असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी अध्यक्ष मुस्लिम जमात कासंम हसनकादे आतार ,निसार नलबंद व इतर उपस्थित होते.