भोर बिग ब्रेकिंग ! संतोष म्हस्के ! आंबाडे-भोर रस्त्यावरील कोसळलेल्या झाडांमुळे १५ जण जखमी : सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे-भोर महत्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर खानापूर ता.भोर येथे शनिवार दि.९ अतिवृष्टीमुळे वाळलेले झाड पहाटेच्या वेळी रस्त्यावर कोसळले होते.रस्त्यावरील कोसळलेले झाड पहाटेच्या वेळी जोरदार पाऊसात कामगारांना दिसले नसल्याने कामगारांच्या दुचाकी झाडाला धडकून १० ते १५ जण जखमी झाल्याची घटना घडली.
           तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. तालुक्यातील अनेक वाहतुकीच्या महत्त्वांच्या रस्त्याशेजारी मोठमोठी वाळलेली झाडे आहेत.ही झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने उन्हाळ्यातच बाजूला करणे आवश्यक होते.मात्र ही जीर्ण झालेली झाडे रस्त्यापासून बाजूला न हटवल्याने सध्याच्या पावसाळ्यात उन्मळून रस्त्यावर पडत आहेत.त्यामुळे अपघात घडत आहेत. रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी तीन ते चार तासाचा कालावधी जात असल्याने त्या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प राहत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे अनेक वाहन चालकांना तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
     चार चाकी वाहनांच्या ड्रायवरने कल्पना दिली असती तर तरुण जखमी झाले नसते भोर-आंबाडे हा रस्ता महत्त्वाच्या वाहतुकीचा आहे. या रस्त्यावरून वीसगाव खोऱ्यातील शेकडो तरुण दररोज शिरवळ येथे कामासाठी ये-जा करीत असतात. शनिवारी पहाटे खानापूर येथे रस्त्यावर कोसळलेले झाड चार चाकी वाहन चालकांना माहीत होते.मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची परिसरात माहिती दिली नसल्याने दहा ते पंधरा दुचाकी वाहन चालक या झाडाला धडकून जखमी झाल्याची घटना घडली.वाहन चालकांनी वाहतुकीच्या मार्गांवर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाल्यास एकमेकांना सांगून मदत केली तर होणारे अपघात थांबतील असे नेरे येथील तरुण कामगार प्रकाश बढे यांनी सांगितलें.

To Top