सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
आज दिनांक 25.07.2022 रोजी 11:20 ते 11:30 वाजेदरम्यान कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, ता इंदापूर, जि पुणे गावचे हद्दीत कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड वय २२ वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळवून येत आहे.
कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट कु भविका राहुल राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषध उपचार कामी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले असून ईतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे.