सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गावरील वरवे ता.भोर येथील तलावात भोर तालुक्यात कार्यरत असणारे तलाठी मुकुंद चिरके वय- ३२ हे मित्रांसमवेत सोमवार दिं.२५ सकाळी पोहण्यासाठी गेले असताना पोहताना दम छाटला नसल्याने पाण्यात बुडालेची घटना घडली आहे.
चिरके हे मागील सहा महिन्यांपूर्वी वेल्हा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते.त्यांची बदली भोर येथे काही दिवसांपूर्वीच झाली होती.सोमवारी सकाळी चिरके हे तीन ते चार मित्रांसमवेत तलावात पोहण्यासाठी गेले पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडाले. चिरके हे पोहण्यात पटाईत होते मात्र पोहताना त्यांचा दम न छाटल्याने ते तलावात बुडाले आहेत. दरम्यान शोधकार्य सुरू आहे.