सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल भोळी या विद्यालयामधे जलशक्ती अभियान व वृक्षारोपण उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण दिडी काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी भोळी गावातील ग्रामस्थ हे ही उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यां मोठ्या उत्साहात दिडी मधे सहभागी होऊ सर्व खंडाळा तालुक्याला एकच संदेश देण्यात आली की झाडे लावा झाडे जगवा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्यधयापक एल.डी. उपार यांनी केले. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ. खांडके, सौ. तनपुरे , सौ. शिंदे , श्री माने , श्री जाधव , श्री कुंभार हे शिक्षक वृंद उपस्थित होते. वृक्षारोपण दिडी साठी उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापक समिती, स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार समिती, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंदे यु.ए यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील लेखनिक श्री शिंदे व श्री भिलारे यांचे सहकार्य लाभले.