खंडाळा ! प्रतिनिधी सचिन चव्हाण ! सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी शिंदे गटाची बांधणी करणार : पुरुषोत्तम जाधव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : सचिन चव्हाण
जिल्हयात प्रस्थापितांच्या विरोधात लढा उभा करायचा आहे . त्यासाठी शिवसैनिकांना ताकद मिळणे गरजेचे आहे . मी स्वार्थासाठी राजकारणात आलो नाही . सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठीच शिंदे गटाची बांधणी करणार असल्याचे शिवसेना मा. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले .
       शिरवळ ता . खंडाळा येथे  बैठक घेण्यात आली . या बैठकीसाठी जिल्हयाचे नेते पुरुषोत्तम जाधव , माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, शिवसेना खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, युवासेना जिल्हा सचिव शरद जाधव, वाई विधानसभा मा. संघटक अंकुश आप्पा महांगरे,शिव उद्योग सहकार सेना सातारा जिल्हाध्यक्ष सचिन भाऊसाहेब चव्हाण, शिवसहकार सेना जिल्हाध्यक्ष सदिप पवार, तज्ञ संचालक लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती भूषण शिंदे , लोणंद शहर शिवसेना नेते विश्वास शिरतोडे ,खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना मा. संचालक भानुदास जाधव, युवासेना तालुकाप्रमुख समीर वीर , शिवसेना विभाग प्रमुख सागर ढमाळ , महाराष्ट्र चॅम्पियन पै. नवनाथ शेंडगे, शिवसेना शिरवळ खजिनदार बाळा राऊत, युवा सेना शिरवळ शहरप्रमुख उमेश चव्हाण, खंडाळा तालुका समन्वय समिती सदस्य राजेंद्र जाधव,शिरवळ उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भांडे, शिवसेना मा. उप तालुकाप्रमुख लक्ष्मणराव जाधव, खंडाळा तालुका शेतकरी कृती समिती अर्जुनराव जगताप, कुंडलिकराव दगडे, युवासेना विभाग प्रमुख अमर शिंदे, शिवसेना उपविभाग प्रमुख तेजस सुतार, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता जाधव, पळशी उपसरपंच एकनाथ भरगुडे,  पारगाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, खंडाळा उपशहर प्रमुख प्रमोद शिंदे ,संजय जाधव , हिंदुराव हाके ,अतिट ग्रामपंचायत मा. सरपंच निवृत्ती जाधव , शेतकरी संघटनेचे नेते प्रमोद जाधव, शिवसेना मा. विभाग प्रमुख रमजान मुजावर,  गणेश पवार, शिवाजी माने शरद ताटे चंद्रकांत माने, बाळासो जाधव यांसह प्रमुख पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायटी चेअरमन, संचालक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . 
        प्रदीप माने म्हणाले , तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याचे काम पुरुषोत्तम जाधव यांनी केले परंतु इथून पुढच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व प्रश्न निधी अभावी रखडले आहेत  नयेत म्हणून सध्याच्या घडामोडीत गावोगावची विकासकामे मार्गी लावण्यासाठी व शिवसैनिकाला ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे . 
॥ ज्या माणसांचा गावाशी संबंध नाही , लोकांशी संपर्क नाही अशांना पदे दिल्यावर शिवसेना कशी वाढणार असा प्रश्नही विश्वास शिरतोडे यांनी उपस्थित केला . यापुढे शिंदे गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले . ॥ 
.........................................
To Top