सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिनेकडील वीसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडी खुर्द ता.भोर येथील शेतकरी कुटुंबातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या हर्षल कालिदास भिलारे याने कौतुकास्पद कामगिरी करीत नवोदय परीक्षेतील गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. हर्षल याच्या यशामुळे त्याचे तालुक्यातून तसेच वीसगाव खोऱ्यातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. हर्षल याची शिक्रापूर येथील नवोदय विद्यालय या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झाली.हर्षलचे वडील कालिदास भिलारे यांनी जिद्दीच्या जोरावर मुलाकडून अभ्यास करून घेतल्याने हर्षलला हे मोठे यश प्राप्त झाले. या विद्यार्थ्यास शाळेतील शिक्षक संजय पवार ,अनिल महांगरे, बापू जेधे,अमर शिरसागर यांनी मार्गदर्शन केले.