सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा उपाध्यक्ष तसेच समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांचे वडील प्रभाकर फरांदे यांचे ९६ व्या वर्षी निधन झाले.
राज्याचे मा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिलीप फरांदे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले.