सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था महाराष्ट्र राज्य निरा च्या वतीने कारगिल विजयी दिनानिमित्त माजी सैनिकांचा गुणगौरव उत्साहात निरा येथे संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार विजयराव मोरे होते कारगिल युद्धात गमावलेल्या सैनिकांची पोकळी भरून निघु शकत आपण सर्व सैनिक करत असलेल्या देशसेवा बद्दल तुम्हाला सर्व बांधवांना शाल्युट असे म्हनुन माजी आमदार विजयराव मोरे यांनी सर्व सैनिकांना स्याल्युट केला. कार्यक़मास प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते निरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे भाऊक झाल्या. भारत मातेसाठी अहोरात्र झनणा- या सैनिकांचे ऋण भारतीय नागरिक कधी फेडु शकत नाही असे मत पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते यांनी व्यक्त केले सोमेश्वर चे माजी सैनिक रासकर यांनी कारगिल युद्धात लढत असताना शहिद झालेले जवान आणि युद्ध करत असतानाचा अनुभव कथन करताना उपस्थितीत सर्व सैनिक बांधवांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या सर्वांनी भाऊक होऊन भारत मातेचा जय घोष केला भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन संपुर्ण हाॅल दणाणून सोडला. सर्व सैनिक बांधवांना गौरवत असताना ऐ मेरे वतन के लोगो जरा ऑख मे भरलो पाणी... गित लावताच सर्व सैनिकांचे ऊर भरून येत होते.
संभाजीराव जगदाळे निवृत्त कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, राज कुमार सॉफ्टवेअर इंजिनियर पुणे आयुर्वेदाचार्य पतंजली, सुधाकर पांढरे माजी सैनिक बाळासाहेब रासकर प़मोद थोपटे भाग्यवान म्हस्के संस्थापक सचिव सविता बरकडे कांचन निगडे निरा सरपंच तेजश्री काकडे सुनील देवकाते यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी पुरंदर रोटरी क्लब आॅफ पुरंदर अध्यक्ष गुलाबराव गायकवाड. कर्नलवाडी सरपंच सुधीर निगडे पिसुर्टी सरपंच सारिका चोरमले उपसरपंच सुखदेव बरकडे पत्रकार संतोष शेंडकर ग़ामपंचायत सदस्य वैशाली काळे अॅड. आशाबी शेख बारामती वरून सुनिल देवकाते पांढरे तसेच सर्व माजी सैनिक संस्थेच्या संस्थापक सचिव सविता बरकडे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रम प़स्थाविक संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी केले सुत्रसंचालन सल्लागार तनुजा शहा यांनी केले तर आभार नवनाथ चोरमले यांनी मानले.