सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जावली : प्रतिनिधी धनंजय गोरे
नागपूर येथे झालेल्या कार्यकारणी व पदाधिकारी निवडीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस तर कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीस पदी पैलवान काका पवार यांची तसेच संपूर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड झाली.
यामध्ये तालीम संघ सातारा व जिल्हा तालीम संघाचे विश्वस्त दीपक साहेबराव पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .नुकतीच सातारा येथे 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली त्याचबरोबर गेली 30 ते 35 वर्ष कुस्ती क्षेत्रासाठी व तालीम संघासाठी ते काम करीत आहेत. आपल्या शालेय जीवनापासून कुस्तीमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादित केलेले आहे. त्याचबरोबर विद्यापीठ स्तरावरचे देखील त्यांनी कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. आपल्या घराण्याची कुस्तीची परंपरा व कुस्ती क्षेत्रासाठी योगदान आणि क्रीडा प्रसारासाठी सातत्याने मदत करणे संस्था उभी राहण्यासाठी भरीव निधी आणणे हे दीपक पवारांचे श्रेय होय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा असो अथवा तालीम संघाची उभारणी असो किंवा जिल्हा तालीम संघाच्या कामकाजामध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाचा वाटा उचललेला आहे.
वडील साहेबराव पवार (भाऊ) अध्यक्ष जिल्हा तालीम संघ सातारा हे गेली 70 वर्ष कुस्ती क्षेत्रासाठी आपले योगदान विनामूल्य देऊन आहेत. त्याचबरोबर गेली 60 वर्ष तालीम संघ सातारा व जिल्हा तालीम संघ सातारा, साहेबराव पवार (भाऊ) यांनी यशस्वीरित्या सुरळीत पार पाडत आहे. नुकतेच आपल्या तालीम संघाची साडेतीन एकराच्या क्षेत्रामध्ये उभी राहत असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची देशातील सर्वात मोठी तालीम उभी राहत आहे. सुमारे 14 कोटी रुपयांचा असणारा हा प्रकल्प त्यातील 30 टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे जिल्ह्यातील मुलांना तालीम संघामध्ये गेली 60 वर्षांमध्ये मोफत प्रशिक्षण व शालेय शिक्षण त्याचप्रमाणे प्रसंगी चांगल्या मल्लाला खुराक देखील पुरवला जात आहे .सुमारे दोनशे मल्लांचे निवासी व्यवस्था असलेली तालीम आता रूप घेत आहे .अशाप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने साहेबराव पवार (भाऊ )यांच्या सलग 15 वर्ष उपाध्यक्ष पदानंतर पहिल्यांदाच दीपक पवार यांना ही संधी दिलेली आहे.
दीपक पवारांच्या निवडीमुळे जिल्ह्यामधील सर्व क्रीडा क्षेत्रात पैलवान मंडळी व कुस्ती शौकीन यांच्यामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर निवडीमुळे दीपक पवार यांचे माननीय राष्ट्रीय नेते शरद पवार (साहेब )व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी अभिनंदन केले