बारामती ! आधी गुरुसी वंदावे l मग साधन साधावे l सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ध्यान, ज्ञान, धैर्य, कर्म ,संस्कार ही सर्व गुरूंची देणगी आहे . दिनांक 13 जुलै 2022 रोजी एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात, चैतन्यपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली. 
       सर्व शिक्षक वृंदांना वंदन करून विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक वृंदांना पुष्पगुच्छ देऊन गुरूंचे आभार मानले . विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून वेगवेगळ्या गीतांमधून सर्व शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला. कार्यक्रमाची शोभा पाहण्यासारखीच होती. दिपाली गायकवाड आणि सुजाता हंगीरे यांच्या भाषणांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली, संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांचा जन्मदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला,  वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जेवणाची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या शिक्षिका वैशाली धुमाळ  व गौरी फरांदे यांनी अगदी उत्साहात केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी संयोगिता चव्हाण व जुई गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, प्राचार्य अजित वाघमारे, उपप्राचार्या अनुराधा खताळ व काकडे  उपस्थित होत्या. सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
To Top