सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम सुरू होते. मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी शालेय मुलांनी गुरूजंनाचे विषयी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास गिरमकर यावेळी मार्गदर्शन केले.
गेली शेकडो वर्षांची गुरू शिष्य परंपरा आहे.सध्या दैनंदिन जिवनात गुरू विषयीची संकल्पना बदलत चालली आहे. सध्या या परंपरेला पावित्र्याची जोड मिळावी तसेच सुसंस्कृत समाज घडावा या हेतूने शाळा महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे आयोजन केले जाते. मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या निमित्ताने आज विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
आजच्या गुरु पौर्णिमे विषयी आयोजित कार्यक्रमात पर्यवेक्षक बाळकृष्ण सुतार व उपशिक्षक राजाराम गोळे यांच्या सह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाचे चे सर्व शिक्षक उपस्थित होते.
छायाचित्र – श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन करताना प्राचार्य