सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
चिंचवाड (ता.शिरोळ) येथील नंदीवाले वसाहत ककडे मळा येथे राहणार्या सौ.चंपाबाई भुपाल ककडे या वृद्ध महिलेचा गळा दाबून खुन करणार्या इसमास कोल्हापुरच्या स्थानिक गुन्हे आन्वेषणच्या पोलीस पथकाने अवघ्या 72 तासात, आरोपीस अटक केली. अतंत्य संवेदनशिल असेलेल्या या गुन्ह्याचा तपास करणे, स्थानिक पोलीसांना जिकीरीचे बनले होते. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी मुख्य सुत्रधार प्रकाश लक्ष्मण नंदिवाले रा शिरोळ यास अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुन्हे अन्वेषण या पथकास दहा हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले.
चिंचवाड येथील ककडे मळ्यात भुपाल ककडे, व त्यांच्या पत्नी चंपाबाई ककडे हे शेतातील घरात रहात होते. संशक्षयीत आरोपी प्रकाश लक्ष्मण नंदीवाले, वय वर्षे 33, राहणार नंदीवाले वसाहत शिरोळ . याने चोरीच्या इराद्याने ककडे यांच्या घरावर दोन दिवस पाळत ठेवली होती दिनांक 30 जुलै 2022 रोजी रोजी रात्री 8.30 ते 9 च्या दरम्यान त्यांच्या घरात पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाना करून गेला. मयत चंपाबाई ककडे यांनी त्यास पिण्यासाठी पाणी दिले. संशयीत आरोपी पाणी पिवून झाल्यावर आचानकपणे घरात घुसन त्यांच्यावर झडप घालून, खाली पाडून त्यांचा गळा दाबून खुन करून, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढून घेवून फरार झाला. सदर घटनेची फिर्याद शिरोळ पोलीसात 31 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी शिरोळ पोलीसांनी संशयीत म्हणून एकास ताब्यात घेतले होते. सदरच्या घटनेने संपुर्ण शिरोळ व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख संजय गोरले, साहय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार यांच्यासह पोलीस अमलदार महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, आसिफ कलायगार, अनिल फास्ते, रंजित कांबळे ,नामदेव यादव, उत्तम सडोलेकर, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर, सचिन बेडकिहाळे यांनी तपास करीत असताना, गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या टोपीच्या वर्णनावरून, येणार्या जाणार्या मार्गावरील सि.सि.टिव्ही फुटेज पहाणी केली. यामध्ये टोपी घातलेला संशयीत आरोपी मोटार सायकलने दिसुन आल्यावर, त्याच्यावर पाळत ठेवली. सदर संशियत प्रकाश नंदिवाले हा चौडेश्वरी सुतगिरणी ते शिरोळ या रोडने जात असताना, त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता. सदरचा गुन्हा केल्या असल्याचे त्याने कबुल केले. प्रकाश नंदिवाले यास पोलीसांनी अटक केली असुन, पुढील तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे करीत आहेत.