वाई ! सभासद व कर्मचाऱ्यांच्या स्वप्नातील 'किसनवीर' पुन्हा दिमाखात उभा करणार : आ. मकरंद पाटील

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
वाई : दौलतराव पिसाळ 
स्व. किसनवीर आबांनी पाच तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उदात हेतूने किसन वीर कारखान्याची निर्मिती केली. त्याच्यावर कळस चढविण्याचे काम स्व. किसन वीरआवांपासून ते लक्ष्मणरावतात्या यांच्या पर्यंत अविरतपणे सुरू राहिले. त्या काळात कारखाना १२०० मेट्रिक टनापासून ४ हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप क्षमता वाढविण्याचे काम झाले. परंतू नंतरच्या काळात कारखान्याची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली. अशा परिस्थितीत सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने कारखान्याची सुत्रे आमच्या हातात दिली. संकटांना न डगमगता येणान्या गळित हंगामासाठी सर्वांच्या सहकार्याने सामोरे जावुन हा हंगाम यशस्वी करून दाखवुन सभासद व कर्मचाऱ्यांच्या स्वप्नातील किसन वीर कारखाना पुन्हा दिमाखात उभा करणार असल्याचा ठाम विश्वास, वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मकरंदआबा पाटील यांनी व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची मील रोलरच पुजन अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकचे चेअरमन नितीन काका पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मकरंदआबा पाटील पुढे म्हणाले की, यंदाच्या हंगामातील सहकारातील पहिल्या कारखान्याचा रोलर पुजन झाला आणि तो कारखाना म्हणजे आपला किसन वीर. त्यामुळे आमचे व्यवस्थापन व सभासद, बिगर सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने हा आनंदाचा व महत्वाचा क्षण आहे. २००३ मध्ये कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी कारखान्याचं वेगळं चित्र निर्माण करून कारखाना ताब्यात घेतला. त्यावेळी कारखान्यामध्ये जवळपास ७ लाख ३० हजार साखर पोती शिल्लक होती तसेच बँकेकडे किरकोळ कर्ज होते. फक्त ५० रूपयांचा हप्ता दिवाळीकरिता देऊ न शकल्यामुळे कारखाना विरोधकांकडे गेला. परंतु आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेंव्हा कारखान्यावर ना साखर शिल्लक, ना अल्कोहोल शिल्लक, ना शेतकऱ्यांना एफआरपी ना कर्मचाऱ्यांना पगार शिल्लक होती ती फक्त आणि फक्त देणी आणि देणीच. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सभासद व कर्मचान्यांनी जो आमच्यावर टाकलेला विश्वास तो सार्थक ठरविण्यासाठीच. आम्ही निवडणुकीपूर्वीच्या सभेमध्ये सांगत होतो कि ज्या कारखान्याचे नेटवर्थ मायनस आहे त्या कारखान्याला कोणतीही बँक कर्जासाठी उभी करणार नाही, यावर एकच उपाय तो म्हणजे भाग भांडवल वाढविणे आणि त्यासाठी मी व माझे व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणजे आज भाग भांडवलापोटी जवळपास २० कोटी रूपये जमा झालेले आहेत. आमच्या व्यवस्थापनाने जे १०० कोटी रूपये भाग भांडवलापोटी जमा करण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. तेही सभासद शेतकरी व कार्यकर्त्यांच्या जोरावर लवकरात लवकर जमा करणार आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी लागणारी यंत्रणेची करारही झालेले असून त्यांना पहिला हप्ता दिलेले असून दुसरा आणि अंतीम हप्ताही लवकरच देणार असून कारखान्याची अंतर्गत कामेही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे राज्य शासनाने आदेश दिले तर १ ऑक्टोंबरला कोणत्याही परिस्थितीत दोन्ही कारखाने सुरू करणार असुन एफआरपीप्रमाणे दर व कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत करणार आहोत. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद शेतकरी व कर्मचारी यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कारण गेली दोन ते तीन वर्षे कारखान्यास ऊस घालूनही एफआरपीची रक्कम न मिळून तसेच कामगारांनाही त्यांच्या घामाचे पैसे न मिळालेले नसूनदेखील आज नुसत्या फोनवरून निमंत्रण मिळून कार्यक्रमास एवढया मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहिल्याने असे दिसून येते की माणसांचे प्रेम व्यक्तिवर नसून संस्थेवर असते. यावेळी खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, बाळासाहेब सोळस्कर यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.
कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात भाग भांडवल वाढविण्यासाठी आमदार मकरंद आबा पाटील, नितीन काका पाटील तसेच सर्व संचालकांनी कशाप्रकारे प्रयत्न केले हे सांगून शेतकऱ्यांनी जो आमच्यावर टाकलेला विश्वास आहे त्यास कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नसल्याचे सांगून दोन्ही कारखान्याचे करार पूर्ण झालेले असून ७० टक्के अॅडव्हान्स दिलेला असून सभासद शेतकऱ्यांनी आपल्या संपुर्ण ऊसाची नोंदणी करून आपला संपूर्ण ऊस हा किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही केले.
कार्यक्रमास शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, सरला खीर, खंडाळा कारखान्याचे व्हा.चेअरमन अनंत तांबे, संचालक चंद्रकांत ढमाळ, दत्तात्रय ढमाळ, अशोक गाढवे, नितीन भुरगुडे-पाटील, विष्णु तळेकर, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, हणमंतराव साळुंखे, धनाजी अहिरेकर, किसन ननावरे, शिवाजी शेळके-पाटील, रत्नकांत भोसले, सुरेश रासकर, विठ्ठल धायगुडे, शंकरराव पवार, सौ. शोभा नेवसे, सौ. शालिनी पवार, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे, प्रताप पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, वाई नगरपरिषेदेच माजी अध्यक्ष अनिल सावंत, अनिल जगताप, महादेव मसकर, मिलिंद भंडारी, सुधीर भोसले, मदन भोसले, मंगेश घुमाळ, सतिश धुमाळ, लालासाहेब शिंदे, शशिकांत पवार, उदयसिंह पिसाळ, दिलीप बाबर, कांतीलाल पवार, ज्ञानेश्वर शिंगटे, अरूण माने, नानासाहेब मिलारे, अजय कदम, संजय साळुंखे, विकास साळुंखे, अजय भोसले, दासबाबु गायकवाड, मोहनराव जाधव, शंकसाव शिंदे, दिपक बाबर, सत्यजीत वीर, लक्ष्मण पिसाळ, सभासद शेतकरी व अधिकारी उपस्थित होते.
-------------------------

To Top