वाई ! देगाव मध्ये तरसाला पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा : ग्रामस्थांनी सतर्क राहावे : स्नेहल मगर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
आज रोजी मौजे- देगाव ता. वाई गावामध्ये 'तरस' या वन्यप्राण्याचा त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी वन विभागास कळवले वरून वाई वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, संग्राम मोरे वनपाल भुईंज,संजय आडे वनरक्षक भुईंज यांनी ग्रामस्थांसह परिसराची पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या,
        तसेच 'तरस' हा वन्य प्राणी कुजलेले अन्न खातो सहसा माणसावर जीवघेणा हल्ला करत नाही तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुत्र्याची शिकार करतो.तरीही लोकांना आव्हान करण्यात येत आहे की जवळपास असणाऱ्या पोल्ट्री किंवा मटन-चिकन विक्रेते यांनी आपले कडील मृत पाण्याचे शिल्लक अवशेष मांस त्यांची व्यवस्थित व दूरवर विल्हेवाट लावावी अशा सूचना  वनक्षेत्रपाल वाई स्नेहल मगर यांनी सांगितले तसेच वन अधिकारी यांनी सांगितले की रात्रीच्या वेळी शेतात व बाहेर जाताना एकटे बाहेर पडू नये तसेच शेतवस्तील लोकांनी फटाके वाजवावेत तसेच सदर वन्यप्राणी 'तरस' त्याचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरा बसविणार असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले.
To Top