सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
संपुर्ण महाराष्ट् कार्यक्षेत्र असणा-या व महाराष्ट्रातील प्रथम
क्रमांकाची संस्था असलेल्या ज्ञानदीप पतसंस्थेने व ज्ञानदीप प्रतिष्ठाण खंडाळा यांच्या वतीने मौजे चवणेश्वर; ता. कोरेगांव येथील डोंगरावर वृक्षारोपनाचा कार्यक्रम नुकताच पार
पडला.
संस्थेचे संस्थापक व्ही. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. यावेळी ज्ञानदीप संस्थेचे अधिकारी कर्मचारी व दैनंदीन ठेव
प्रतिनिधी तसेच ज्ञानदीप प्रतिष्ठान ज्ञानदीप इंग्लिश मेडीयम स्कुलचे शिक्षक व विदयार्थी यांनी श्रमदान करून वृक्षारोपन केले. यावेळी वृक्ष लावणे सोपे आहे. परंतू जगविणे फार महत्वाचे आहे. झाडामुळे ऑक्सिजन मिळतो. शुद्ध हवा, फळे मिळतात तरीही काही लोक झाडे तोडतात, वणवा लावतात हे चांगले नाही. वणवा विझवणे गरजेचे आहे.
ज्ञानदीप अर्थकारण करून नेहमी सामाजिक कामे करते. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, ओढा जोड प्रकल्प असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्याच बरोबर
बॅकींग व्यवसाय सुद्धा राज्यात एक नंबरचा केला आहे असे संचालक गजानन धुमाळ यांनी सांगितले. विदयावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितले की,
लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. शाळेतील मुलांचे कौतुक करणेत आले. स्वतः खड्डे घेवून वृक्षारोपन केले. तसेच डोंगरावर झाडांचे गुरांपासून संरक्षण
करावे असे पोलीसपाटील यांना सागणेत आले. डॉ. कांबळे यांनी दोस्ती कशी असावी याची गोष्ट सांगितली. नेहमी मोठे स्वप्न पहा व साकार करा. जिद्द पाहिजे. प्रत्येक व्यक्तिने 2 झाडे जगविली पाहिजेत. आज श्री गजानन धुमाळ यांच्यामुळे मी डॉक्टर झालो असे सांगितले. परिस्थिती बदलते काळ बदलतो. निसर्ग वाचविणे गरजेचे आहे.
यावेळी चवणेश्वरचे पोलीस पाटील किरण पाटील, विलास चव्हाण, संपत शिंदे, करंजखोपचे उपसरपंच संदीप धुमाळ, राजेंद्र धुमाळ, ज्ञानदीपचे कर्मचारी प्रतिनिधी दिपक पवार, ज्ञानदीपचे मुख्य वसूली अधिकारी शरद पवार, वाई शाखेचे शाखाप्रमुख मधुकर यादव, वाठार शाखेचे शाखाप्रमुख राहूल धुमाळ, तसेच ज्ञानदीपचे कर्मचारी सुधीर धुमाळ, शेखर चव्हाण, प्रशांत डेरे, अमोल शिंदे, योगेश तरडे, अजिंक्य पिसाळ व वाठार शाखेचे दैनंदीन ठेव प्रतिनिधी दत्तात्रय पवार, बाबुराव पुजारी, गणेश लेंभे, दत्ता अहिरेकर तसेच ज्ञानदीप इंग्लिश मेडीयम स्कुलचे नाचण, पृथ्वीराज धुमाळ, बाळासाहेब रेक्टर पुष्पल व विदयार्थी उपस्थित होते.