बारामती ! प्रतिनिधी : सुनील जाधव ! कालच्या मुसळधार पावसाने जाग्या केल्या वडगाव निंबाळकर ग्रामस्थांच्या आठवणी ! गेल्यावर्षी अनेक घरांमध्ये घुसले होते पावसाचे पाणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव : सुनील जाधव  
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे बुधवारी दिवसभर कडक ऊन पडले होते आणि वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६ वाजता दरम्यान मुसळधार पाऊस पडू लागला. श्रावण महिन्यामध्ये हलक्या पाऊस सरी अनुभवता येतात परंतु यंदा श्रावण महिन्यात जोरदार पाऊस पडू लागला आहे. बुधवारी सायंकाळी पाऊस सुरू झाला बघता-बघता सगळीकडे पाणीच पाणी जोरदार पाऊस झाल्याने ओढे- नाले,विहिर तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नुकत्याच शेतकऱ्यांच्या ऊस लागण झालेल्या आहेत, जोरदार पावसामुळे शेतामधून पाणी वाहत आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन,बाजरी ,ऊस,मका या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरेकर मळा पेरूचा मळा,परांडे मळा, साळूंके मळा,वडगाव निंबाळकर परिसर येथे पाणी साचल्यामुळे ये -जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली,यावेळी तात्काळ सरपंच सुनिल ढोले,ग्रामसेवक धावडे साहेब,ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य यांनी भेट देऊन तुंबलेले पाणी काडून दिले व  कच्चा रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली. पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे, येणाऱ्या काळात पावसाचे अशीच अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. सरपंच पाहणी दौरा यावेळी सरपंचांनी अतिवृष्टीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान यांना पंचनामे करून तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे व ग्रामपंचायत होईल तेवढी मदत करण्यास सहकार्य करेल  असे सांगितले.
To Top