सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर ज्ञान मिळावे, वन्य पशुपक्षी व त्यांचे संरक्षण या विषयी माहिती मिळावी या हेतूने एस. डी सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये 2 ऑगस्ट रोजी RESQ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यामार्फत वन्य प्राणी जीव बचाव प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या वेळी नचिकेत उत्पात यांनी विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे प्राण्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. व्हिडिओ द्वारे विद्यार्थ्यांना कशाप्रकारे जखमी प्राण्यांची मदत केली पाहिजे , त्यांच्यावर प्रथम उपचार केले पाहिजेत, याविषयी माहिती दाखवली पशुपक्षी व प्राण्यांविषयी आपल्या मनात संवेदनशीलता असली पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन, वन्य प्राण्यांचे संरक्षण ही काळाची गरज आहे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले.
कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत ,सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य अजित वाघमारे ,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.