भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! बस चालकाने २५ प्रवाशांचे प्राण वाचवून सोडला जीव : पुणे-सातारा महामार्गावर एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
भोर : संतोष म्हस्के
 मुंबई वसईहून म्हसवडकडे जाताना एसटी बस  चालकाला पुणे-सातारा महामार्गावर वरवे ता.भोर येथे बस चालवीत असताना चक्कर येऊन हृदयविकाराचा झटका आला.अशा परिस्थितीतही चालकाने प्रसंग अवधान राखून बस रस्त्याच्या बाजुला घेऊन २५ प्रवाशांना वाचवून प्राण सोडला.चालकाच्या मृत्यु मुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
     बस चालक जालिंदर रंगराव पवार वय-४५  रा.पळशी ता.खटाव जि.सातारा असे मृत्यु पावलेल्या चालकाचे नाव असुन ते दिं.३ वसई आगारातुन एसटी  बस क्र.एम एच १४ बीटी ३३४९ घेऊन म्हसवड सातारा येथे चालले होते. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पुणे- सातारा महामार्गावर वरवे गावच्या हद्दीत बस आली असताना बसचा वेग अचानक मंदावला असल्याने पवार यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी पवार त्यांना विचारणा केली असता मला चक्कर येत आहे असे म्हणुन पवार यांनी बस रस्त्याच्या बाजुला घेऊन थांबवली.काही वेळातच बसच्या स्टेअरींगवर डोके ठेऊन पवार यांनी  प्राण सोडले. वाहक संतोष गवळी यांनी काय होते आहे तुम्हाला म्हणुन आवाज दिला परंतु त्यांचा प्रतिसाद न आल्याने वाहक गवऴी यांनी प्रवाशांच्या मदतीने पवार यांना बाजुला घेऊन स्वतःहा बस चालवत नसरापूर येथील सिध्दिविनायक हाँस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी नेले.परंतु उपाचारापुर्वीच त्यांचा मृ्त्यु झाल्याचे डाँक्टारांनी सांगितले.
जालिंदर पवार हे या बसवर बदली चालक म्हणुन आले होते .वसई येथुन बस दुपारी साडेबारा वाजता  स्वारगेट येथे आल्यावर तेथुन पुढे पवार यांनी बस चालवण्यासाठी घेतली होती. खेड शिवापुर टोलनाक्याच्या पुढील बाजूस त्यांना काहीसे अस्वस्थ झाले होते त्यामुळे बसचा वेग मंदावला होता .वरवे गावच्या हद्दीत आल्यावर त्यांना जास्त त्रास झाल्याने बस बाजुला घेतली यावेळीच हृदयविकाराच्या जोरदार झटक्याने त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधनाने बस मधील २५ प्रवाशांचा प्राण वाचले.
या घटने बाबत वाहक (कंडक्टर) संतोष गवळी यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पोलिसांनी याची नोंद घेऊन शवविच्छेदना नंतर मृतदेह पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला 
To Top