सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई नगर परिषदेच्या माजी नगरसेविका शोभा दत्तात्रय शिंदे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर सोनगिरवाडी येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, विवाहित दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. पश्चिम भागाचे लोकनेते व सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांच्या त्या भावजई होत. त्यांच्या निधनाने वाई शहरात व पश्चिम भागात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.