सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०२ / ०८ / २०२२ ते ०४ / ०८ / २०२२ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
दि. ०२/०८/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी 'साहित्य आणि मूल्यशिक्षण ' या विषयावर प्रा.डाॅ. आनंदा गांगुर्डे यांनी विचार मांडले. माणूस हा समाजशील प्राणी असून वाचनाने माणूस समृद्ध व प्रगल्भ होतो . साहित्याची अंतिम जबाबदारी ही चांगला माणूस घडविणे हीच आहे.अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. नितीन कुलकर्णी हे होते. त्यांनी कै . बाबांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून कै. बाबांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून सांगितले. सहसचिव श्री . सतीश लकडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. त्यामध्ये कै.बाबांची दानशूर वृत्ती, त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. तर उपप्राचार्य डॉ.जया कदम यांनी आभार मानले.
दि. ०३ / ०८ / २०२२ रोजी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी 'माझे पर्यावरण, माझी बांधिलकी ' या विषयावर प्रा. आर .बी. देशमुख यांनी व्याख्यान दिले. वाढते औद्योगिकीकरण , नागरीकरण त्यातून निर्माण होणारे प्रदूषण , अमर्याद वृक्षतोड ,वाढणारे तापमान यामुळे निसर्गाचा असमतोल होत आहे. पर्यावरण वाचविले तरच जीवसृष्टी वाचेल तेव्हा मानवी समूहाने पर्यावरणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंग सांगून त्यांनी विषयाची मांडणी केली. अध्यक्षीय मनोगतात प्रा. विलास बोबडे यांनी कै. बाबांच्या आठवणी सांगितल्या.याप्रसंगी रूषीकेश धुमाळ यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. श्रीकांत घाडगे यांनी मानले
दि. ०४ / ०८ / २०२२ रोजी व्याख्यानमालेचा तिसरा दिवस या दिवशी ' विविधतेत एकता ' या विषयावर प्रा.डॉ.दिनेश मोरे यांनी विचार मांडले.भारत हा बहुसांस्कृतिक , बहुभाषिक देश आहे. अनेक धर्माचे , जातीचे , वर्णाचे , वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक भारतात राहतात , तरीही राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सर्व भारतीय एक आहेत. बहुविविधताच भारताचे सामर्थ्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. संजय घाडगे यांनी कै. बाबांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी श्री. भीमराव बनसोडे , धोंडिराम आगवणे व सौ. सुजाता भोईटे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार डाॅ. संजू जाधव यांनी मानले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ जगन्नाथ साळवे , डाॅ. जया कदम सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, सेवक कार्यक्रमास उपस्थित होते.