भोर ! भविष्यकाळाची गरज ओळखून वृक्षारोपण : पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
सद्याच्या काळात समाजातील सर्व घटकांनी पुढे येवून सामाजिक बांधिलकी जपत निरार्गाचा होणारा ऱ्हास थांबवून नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे.नागरिकांनी भविष्यकाळाची गरज ओळखून वृक्षारोपण करावे असे प्रतिपादन भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी ठाण्याच्या आवारातील वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले.
      डॉ. विनिता आपटे तेरे पॉलिसी सेंटर पुणे या संस्थेच्या माध्यमातून शेकडो वृक्ष रोपणासाठी देण्यात आली होती.यात झांबुळ,सिस तसेच जंगली वृक्ष असून त्यांचे रोपण भोर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल दबडे यांच्या हस्ते शुक्रवार दी .५ करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे ,पोलीस हवालदार दत्तात्रय खेंगरे,अशोक खुटवड ,सुनील चव्हाण,यशवंत शिंदे,शौकत शेख ,विजय नवले ,विकास लगस, दामिनी दाभाडे ,निलेश सटाले,सुशांत पिसाळ,अविनाश निगडे सागर झेंडे आदींसह पोलीस कर्मचारी हजर होते.
To Top