सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : (प्रतिनिधी
भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरणे 17 मेंढ्या चिरडल्याची घटना शहरातील इंदापूर रोडला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गावर घडली. यामध्ये मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शहरातील इंदापूर रोड मार्गाला जोडणाऱ्या बाह्य वळण रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाºया डंपर (क्र एमएच ११ सीएच ७५११) च्या चालकाने बेदकारपणे मेंढ्या चिरडल्या. ही घटना पाहून नागरिकांनी गर्दी केली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली..संभाजी मोठे या मेंढपाळाच्या या मेंढ्या आहेत.सुमारे १७ मेंढ्या अपघातात चिरडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली.घटनास्थळी मेंढपाळ महिलेचा आक्रोश पाहुन उपस्थितांची मने हेलावली.
भाजप चे अभिराज देवकाते हे तातडीने घटनास्थळी पोहचले. मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय डंपर नेऊ दिला जाणार नसल्याची भुमिका देवकाते यांनी घेतली आहे.पोलीसांनी येथे एकेरी वाहतुक सुरु ठेवत पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.अपघातस्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मेंढपाळस नुकसान भरपाई तसेच चालकांवर कारवाई करावी अशी मागणी अभिराज देवकाते, बापूराव सोलंकर, संपत टकले आदींनी केले आहे.