सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद पोलीस ठाण्यात दूचाकी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस पकडून त्याच्याकडून चोरीची दूचाकी हस्तगत करण्यात यश संपादन केले आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी, मागील महिन्यात दि.२१ जुलै रोजी लोणंद येथील अजय बाबुलाल शहा रा. लोणंद ता. खंडाळा याच्या मालकीची टीव्हीएस ज्युपीटर क्र. एमएच १२ पीके १४६३ ही स्कुटी चोरीस (Crime) गेल्याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती. सदर गुन्हयाचा तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी गुन्हयाची माहीती घेवुन आरोपीचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना दिल्या त्या प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ सदर घडले ठिकाणावरून संशईत आरोपींची माहीती घेवुन व गोपनिय माहीती तसेच तांत्रिक माहीतीच्या आधारे सचिन बाळु माने वय २५ वर्षे रा. दत्तनगर, आंदरूड ता. फलटण या आरोपींस ताब्यात घेवुन त्याच्याकडुन चोरीस गेलेली रु. ७५,०००/- ची टीव्हीएस ज्युपीटर क्र. एमएच १२ पीके १४६३ ही गाडी हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बरडे सो, लोणंद पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरिक्षक विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, केतन लाळगे, अभिजित घनवट यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईबाबत मा. पोलीस अधिक्षक सो, श्री अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक सो, श्री अजित बोऱ्हाडे यांनी वरील पथकाचे अभिनंदन केले आहे.