वाई ! गंगापूरीतील विविध विकास कामांचा महिलांच्या हस्ते शुभारंभ

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षात जन नायक आमदार मकरंद पाटील यांनी वाई शहराचे रूप पालटण्याचा सपाटा लावला असून वाई शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गंगापूरी नावेची वाडी येथे विविध विकासकामे पूर्ण होवून काही पूर्णवस्थेत व काही चालू आहेत. संपूर्ण गांगापुरीमधील बंदिस्त गटार योजनेस कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल गंगापूरीतील महिलांच्या हस्ते विविध विकास कामांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. 
     विशेष म्हणजे लहान मुले रस्त्यावर खेळत असताना , खेळाच्या वस्तू गटारीत जाताना तशाच त्या वस्तू परत बाहेर काढून न स्वच्छ करता मुले परत खेळतात त्यामुळे आरोग्याचा प्रश्न तयार होतो . बंदिस्त गटारांमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असून परिसर स्वच्छ राहणार असल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे उद्गार सौ. नीलिमा सरकाळे यांनी काढले. 
     कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत तर्कतीर्थ आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, नगरसेवक प्रदीप चोरगे, अजित शिंदे, अशोकराव सरकाळे, संजय जाधव, विष्णू पिसाळ, आबा चोरगे, संतोष घोरपडे, राजू कांबळे, सुशील मोरे, स्वप्नील गायकवाड, महेश गोळे, गणेश तरडे, विलास सोळवंडे, संजय शिंदे, अनंत माने, यशवंत गिझरे, संतोष देवराशे,बाळकृष्ण फरांदे आणि सुरेश कानडे हे मान्यवर उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमा परिहार, रेखा देशमाने, मनाली घोले, स्नेहल सुतार, भारती शिंदे, भारती फरांदे, माधवी देवरासे, अर्चना महिस्ने, स्वाती पारटे, शुभांगी गिजरे, विमल बळीप, सुनीता जाधव, विद्या काकडे, राजश्री जाधव, सुनीता सणस यांनी परिश्रम घेतले. आभार नीलिमा सरकाळे यांनी मानले.
To Top