बारामती ! राज्याचा बंद पडलेला कारभार पाहताना मुख्यमंत्री आजारी पडले : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा घाणाघात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
दोघांनी जनतेच्या हिताच्या प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम चालवलं आहे. कोणत्या हेतूने असे करत आहेत कळत नाही. स्थगित कामे पुढे होणार की नाही हेही सांगत नाहीत. आता दोघेच राज्याचा कारभार बघत असल्यामुळे कारभार ठप्प झाला आहे. त्याचा तान येऊन मुख्यमंत्री आजारी पडले. फडणवीस यांच्याकडे कुठलं खात नाही. आणि राज्याच्या सचिवांना बोललो तर म्हणतात आदेश पाहिजे, अशी स्थिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली
             नसायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या उपक्रमांतर्गत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. याप्रसंगी उद्योजक डी. पी. जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी सभापती प्रमोद काकडे, आनंदकुमार होळकर, गोरख चौलंग,  शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, सचिन सातव,  भाऊसाहेब करे, ज्ञानेश्वर कौले, अमृता गार्डी,  पवार म्हणाले, सरपंच जनतेतून होतो, महापालिकेतून महापौर करता. मग मुख्यमंत्री, पंतप्रधान जनतेतून करा. ठराविक ठिकाणी वेगळी आणि ठराविक ठिकाणी वेगळी भूमिका हे वागणं बरं नव्ह.
बाजार समितीमध्येही वर्षांनुवर्षे परंपरा बदलून आमदारकी सारख मतदान होणार आहे. काही बाजार समित्यांची निवडणूक खर्च भरायची क्षमता नाही. राज्यात 60 ते 65 टक्के बाजार समित्या कर्मचारी पगार करताना ओढाताण होते. हे बदल असणारे बिल विधानसभेत आणतील मग चर्चा होईल मग बिल पास होईल. त्यामध्ये आम्ही आमच्या भूमिका मांडू. पण अजून महिना झाले मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही. अतिवृष्टी झालीय. शेतकरी आत्महत्या करतोय. याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना भेटुन अडचणीत असलेल्याना बाहेर काढा सांगतोय. 
पण विस्तार काही होईना 106 जणांना वाटतंय आपल्यालाही मंत्रिपद पाहिजे. शिंदे 40 जणांना घेऊन गेले. सगळ्यांनाच मंत्री करतो सांगितलं का काय? अशी मिश्किली पवार यांनी केली.
उपसरपंच प्रमोद जगताप यांनी प्रास्तविक केले सरपंच हनुमंत भगत यांनी आभार मानले.
To Top