सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात ५ कोटी ७२ लाख निधींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन,उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
विकास कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौपाटी ते महाड नाका रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करणे साठी ३ कोटी ५० लक्ष, अविनाश जगताप घर ते रावळ चौक (मागील बाजू) रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २ कोटी १२ लक्ष या कामांचे भूमिपूजन तर महाड - पंढरपूर रोड ते वाघजाई माता मंदिर स्ट्रेट लाईट बसवणे १० लक्ष या कामाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी राजगड ज्ञानपीठ मानद सचिव स्वरूपा थोपटे,नगरध्यक्षा निर्मला आवारे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे,अमित सागळे, गणेश पवार ,तृप्ती किरवे,रूपाली कांबळे, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष,महिला अध्यक्षा,सर्व सेलचे पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवक, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.