सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई शहरातील रविवार पेठ येथील रहिवासी असलेला विकास सदाशिव वैराट वय ३२ या तरुणाचा वाई येथील कृष्णा नदी पात्रातील रामडोहात बुडुन मृत्यू झाल्याची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे .
याची माहिती वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना घटना स्थळावर पाठवले पोलिसांनी नातेवाईकांना सोबत घेऊन मृतदेहाचा शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने भरणे यांनी तात्काळ दिनांक. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.15 च्या दरम्यान महाबळेश्वर ट्रेकर्स चे सदस्य सुनील बाबा भाटिया यांना वाई येथून कॉल केला की रामडोह येथे एक मुलगा पाण्यात वाहून गेला आहे अशी माहिती दिली त्या नंतर महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेसक्यु टीम चे जवान घटना स्थळाकडे रवाना झाले ती टीम वाई येथे दाखल झाली त्यांनी 10 मिनिटात च मृतदेह शोधण्यास या दोन्ही टीम च्या जवानांना यश आले या मोहिमेत सुनील बाबा भाटिया, अनिल केळगने, अनिकेत वागदरे, अनिल लांगी, आशिष बिरामणे, तेजस जवळ, सौरभ गोळे, सौरव सालेकर अक्षय नाविलकर, रोहन कांबळे सहभागी होते
या घटनेची खबर राकेश सदाशिव वैराट वय २७ यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.