सभासदांच्या विश्वासामुळेच पाच हजार कोटींचा समिश्र व्यवसाय यशस्वी : विश्वनाथ पवार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
संस्था सभासदांना जवळ हवी असते यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातुन
प्रत्येक सभासदाच्या जवळ पोहचणेचा प्रयत्न करीत आहोत. तसेच संस्थेने ऑगस्ट 2022 मध्ये रू. 5 हजार
कोटी संमिश्र व्यवसाय पूर्ती केले बाबत सभासद, ठेवीदार, कर्मचारी व प्रतिनिधी यांचे अभिनंदन करुन या
सर्वानी संस्थेवर विश्वास व्यक्त केल्यामुळेच हे शक्य झाले असे उदगार ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट
सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वनाथ पवार यांनी संस्थेच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण समेत
अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र
मुलुंड पूर्व, मुंबई येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
विश्वनाथ पवार पुढे म्हणाले संस्था प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस धोरणात्मक बैठक घेते सदर
धोरणाबाबत सविस्तर चर्चा करून धोरण निश्चिती करते. प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक वसुली इत्यादी तत्सम
विषयाबाबतचे वार्षिक धोरण निश्चित केले जाते. संस्थेची 5 सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आहेत त्यामधुन
कर्मचा-यांवर संस्कार रुजले पाहिजेत यासाठी सातत्याने प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे संस्थेची ग्राहक सेवा
उत्तम आहे. संस्थेने कर्ज वाटपाबाबत सक्षम धोरण अवलंबिले आहे. संस्था गुंतवणुकीचे धोरण निश्चित
करताना सक्षम व शेडयुल बॅकांचा अभ्यास करुन गुंतवणुकीचे धोरण राबवित असते.
संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. जिजाबा पवार यांनी 97 वी घटना दुरुस्ती रद्द झाल्याने त्या अनुषंगाने
संस्थेच्या आदर्श उपविधीमध्ये कायदयाशी सुसंगत बदल करणे आवश्यक असल्याने त्याबाबतची सविस्तर
माहिती सभागृहाला दिली. सदर उपविधीस राज्य शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर राज्यातील इतर
पतसंस्थासाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला. वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर सर्व
सभासदांना तात्काळ लाभांश सभासदांच्या बचत खाती वर्ग करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात
येणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी रतनसिंह शिंदे, तानाजी मोरे भरत आशर, दत्ता मर्ढेकर, शांताराम भालेराव, अशोक पंडया,
प्रकाशचंद्र महाजन यांच्या शुभहस्ते गणेशपूजन व दीपप्रज्वलनाने समेस प्रारंभ झाला. यावेळी
अहवालसालातील दिवंगत झालेल्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन संचालक बाळकृष्ण पवार यांनी केले. आर्थिक वर्षात संचालक
मंडळाने केलेल्या कार्याच्या अहवालाचे वाचन संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ जगताप यांनी करताना दिनांक 31
मार्च 2022 अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय रू 4794.76 कोटी, स्वनिधी रू 360.31 कोटी, सभासद 2,66,411,
वसुल भाग भांडवल रू 148.56 कोटी, राखीव व इतर निधी 362.46 कोटी, व थकबाकीचे प्रमाण 5.84 टक्के
असल्याचे नमुद केले. निव्वळ एन. पी. ए. 1.55 टक्के आहे. मार्च 22 अखेर संस्थेने एन. पी. ए. तदतुद 123.
64 कोटी केली असल्याचे सांगितले. संस्थेच्या सद्यस्थितीत 110 शाखा, 8 विभागीय कार्यालये व 1 सुसज्ज
प्रशासकीय कार्यालय आहे. याबरोबर संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे असे त्यांनी सांगितले.
आर्थिक पत्रकांचे वाचन सचिव चंद्रकांत ढमाळ यांनी केले. संस्थेच्या ठेवी 2758.24 कोटी, कर्जे
2036.52 कोटी, गुंतवणुक 1099.90 कोटी तसेच भांडवल व देणे आणि मालमत्ता व येणे इ. माहिती सादर
केली. एकूण उत्पन्नातून खर्च व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू. 23.11 कोटी झाला असुन सभासदांना
लाभांश 10 टक्के देण्याचे जाहीर केले.
संचालक चंद्रकांत शिंदे, गजानन धुमाळ, विजय कासुर्डे, निवृत्ती मस्के, दुर्गा वाघ, संजय पवार,
अनुप पवार, व बाळासाहेब वांजळे यांनी विषय सुचीनुसार विषयांचे वाचन करुन ठराव मांडले, त्यास
उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी विश्वनाथ पवार व संचालकपदी
गजानन धुमाळ यांची निवड झाल्याबदल तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी
जिजाबा पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
संचालक रविंद्र केंजळे यांनी सुत्रसंचालन केले. उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कार्यपध्दतीचे कौतुक
केले. संचालिका सौ. छाया शिंदे यांनी आभार मानले. यावेळी संचालक दुष्यंत जगदाळे, हणमंत धिवार,
निवृत्ती मस्के, कर्मचारी प्रतिनिधी दिपक पवार, सभासद सी.ऐ शरदचंद्र फडके, ह.भ.प माने, कल्पना जगताप
आदी उपस्थित होते. सभा यशस्वी होणेकरीता मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, उपमुख्यव्यवस्थापक रामचंद्र पिसे, विभागीय व्यवस्थापक श्रीरंग शिर्के, दत्तात्रय गाढवे, सुधाकर मोरे, दत्तात्रय नावडकर, संजय पवार,
विश्वनाथ पोळ श्रीकांत यादव, बापुराव खोपडे, शरद पवार, शशिकांत भिलारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो खालील ओळी -: वार्षिक सभेत बोलताना विश्वनाथ पवार शेजारी रविंद्र केंजळे, बाळकृष्ण पवार,
चंद्रकांत ढमाळ, जिजाबा पवार, एकनाथ जगताप, चंद्रकांत शिंदे, गजानन धुमाळ, छाया शिंदे व इतर
To Top