सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी भोर शहर भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा,घर घर तिरंगा अभियान अंतर्गत शहरामध्ये १ हजार राष्ट्रध्वज मोफत वाटप करण्यात आले.कार्यक्रमांचे नियोजन भोर शहर भाजपा अध्यक्ष सचिन मांडके यांनी केले.
हर घर तिरंगा, घर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत हजारो नागरिकांना जनजागृती करीत वंदे मातरम भारत माता की जय घोषणा देत तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पंकज खुर्द, पुणे जिल्हा कायदा आघाडी उपाध्यक्ष कपिल दुसंगे ,भोर तालुका महिलाध्यक्षा दिपाली शेटे भोर ,शहर महिलाध्यक्षा स्वाती गांधी ,भोर तालुका उपाध्यक्ष संतोष लोहकरे ,व्यापारी आघाडी अध्यक्ष अमर ओसवाल, दत्तात्रय झांजले व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.