सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे- सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्यामध्ये पुणेहून साताऱ्याकडे जात असताना रविवार दि.१४ चार चाकी प्रायव्हेट टाटा टॅगॉन गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी बोगद्यात जळून जागेवर खाक झाली.नशीब बलवत्तर म्हणून गाडीला आग लागली त्याचे लक्षात येतात गाडीतील दांपत्य सुखरूप बाहेर पडले असून गाडीतील या दांपत्यास काही दुखापत झालेली नाही.
पुणे- सातारा महामार्गावर आत्तापर्यंत असे अनेक प्रकार घडले आहेत मात्र या अपघातांमध्ये एकही व्यक्ती दगावलेला नाही.जळालेली गाडी वीझवण्यासाठी घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्या अगोदरच आगीने रुद्र अवतार घेतल्याने गाडी जागेवरच जळून खाक झाली. बोगद्यातच गाडीने पेट घेतल्याने पुणे होऊन सातारा कडे जाणाऱ्या गाड्यांना काही वेळ अडथळा निर्माण झाला आहे.तर ही चार चाकी गाडी पूर्णपणे जळाल्याने गाडी नंबर उपलब्ध होऊ शकला नाही.