सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
थोपटेवाडी तालुका बारामती येथे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी या ठिकाणी पंचायत समिती बारामती मा. सभापती प्रदीप धापटे यांच्या हस्ते ६२ झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले,
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चे संचालक ऋषी गायकवाड यांनी वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करून दिली होती. यावेळी थोपटेवाडीच्या सरपंच रेखा बनकर, उपसरपंच राणी पानसरे, पोलीस पाटील नितीन थोपटे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण गावडे संतोष, संतोष खांडेकर, रिटायर कॅप्टन जयवत थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेस IT सेलचे तालुका अध्यक्ष, प्रमोद पानसरे, पत्रकार सचिन वाघ, ग्रामस्थ सुनील गायकवाड, वसंतराव जाधव, सचिन आडागळे, धनंजय पडवळ, संतोष जगदाळे, राजाभाऊ पानसरे, दत्ता बनकर हे उपस्थित होते.