शिरोळ ! प्रतिनिधी : चंद्रकांत भाट ! 'लायन्स क्लब ऑफ शिरोळ'चे कार्य आदर्शवत : नगराध्यक्ष अमरसिंह पाटील

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : चंद्रकांत भाट
 येथील लायन्स क्लब ऑफ शिरोळ यांच्या वतीने परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करून सर्वसामान्यांना मदत करण्याचे आदर्शवत कार्य केले आहे असे प्रतिपादन शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले
लायन्स क्लब ऑफ शिरोळ यांच्यावतीने 25 विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील नगरसेवक एन वाय जाधव सुभाष माळी व लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बोलत होते
लायन्स क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष उद्योगपती सचिन माळी स्वागत व प्रस्ताविकामध्ये म्हणाले की लायन्स क्लबच्या माध्यमातून गरजूंना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न आमचा राहील अनेक अभिनव उपक्रम राबवण्याचा  मानस असल्याचेही त्यांनी सांगितले
यावेळी लायन्स क्लबचे किशोर पाटील रेंदाळकर महेश मोरे  सुनील देशमुख चंद्रशेखर पाटील गजानन चव्हाण मनोज पाटील अजित गतारे बुधाजी चूडमुंगे अभिजीत माने डॉ  सुशांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार सनीसिंह पाटील यांनी मानले
To Top