सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर ता.हवेली येथील शिवापुर वाडा कोंढनपुर रोडवरील श्री गणेश ज्वेलर्स दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी बुधवार दि.२४ रात्री आठच्या दरम्यान दरोडा टाकत ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास करून पोवारा केला.तर शेजारील सलूनच्या दुकानावर ही चोरट्यांनी हल्ला केला असल्याची घटना घडली.याची फिर्याद राजगड पोलिसांमध्ये धुकसिंग वागसिंग राजपूत रा.शिवापूर ता.हवेली यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि.२४ रात्री आठच्या दरम्यान शिवापुर ता. हवेली येथील कोंडणपुर रोडवरील श्री गणेश ज्वेलर्स दुकानाजवळ चार अज्ञात व्यक्ती येऊन त्यातील दोन अज्ञातांनी दुकानात येऊन हिंदी मध्ये बोलत हातातील पिस्तूल रोखून साथीदाराच्या साह्याने हातातील कोयत्याने दुकानातील काउंटरच्या काचा फोडून नासधुस केली. त्यावेळी अज्ञात तिसऱ्या चोरट्याने काउंटरच्या पाठीमागे असलेल्या लाकडी कपाटावर ठेवलेले ८७ ग्रॅम वजनाचे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून दोन मोटार सायकल वरून पोबारा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवसरे करीत आहेत.
दरम्यान भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळाची पाणी करून श्वान पथकाला पाचारण केले असून महत्त्वाचे ठिकाणी पोलिसांची पदके रवाना करण्यात आली आहेत.
COMMENTS