सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई येथील परशुराम मंदिराच्या समोरच कृष्णा नदीच्या पात्राजवळ वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गर्दी केली होती. वाई पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले होते. मृतदेह कोणाचा असावा याचा शोध पोलीस घेत असतानाच गर्दीतूनच विजय शेडगे हे पुढे आले आणि त्यांनी मृतदेह पाहताच त्यांनी त्यांचे चुलत चुलते सर्जेरावव शंकर शेडगे (वय 92) असल्याची ओळखले. त्यांचा कृष्णा नदीच्या पात्रात पाण्यात पाय घसरुन बुडून मृत्यू झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
कृष्णा नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. नागरिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कोणाचा आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्याच दरम्यान, त्याच गर्दीतून एकजण पुढे येवून मृतदेहाची पाहणी केली. त्यांनी लगेच त्या मृतदेहाची ओळख पटवली. त्यानुसार विजय शेडगे (रा. यशवंतनगर) यांनी वाई पोलिसांना खबर दिली असून त्यांचे चुलत चुलते सर्जेराव शंकर शेडगे हे त्यांच्या घराच्या शेजारीच राहतात. त्यांना सहा मुली असून त्या त्यांच्या सासरी असतात. सर्जेराव शेडगे हे दिवसभर रात्रीचे कधीही कोठेही फिरत असतात. ते विजय शेडगे यांच्याकडे जेवणासाठी कधीतरी जायचे. दि. 25 रोजी पहाटे चार वाजता अंकुश शेडगे यांची चुलत बहिणी मंगल सुर्वे हिने अंकुश शेडगे यांना हाक मारुन सांगिलते की वडिल घरात नाहीत. तेव्हा अंकुश शेडगे, सचिन कदम, नागू पुजारी, संतोष जाधव हे त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास परशुराम मंदिराच्या बाजूला लोकांची गर्दी दिसली म्हणून तेथे जावून पाहिले असता पालथ्या अवस्थेत मृतदेह सर्जेराव शेडगे यांचा असल्याचे. याचा तपास वाई पोलीस करत आहेत, अशी माहिती वाई पोर्लींस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी दिली.