मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर 'आज' ट्रैफिक ब्लॉक ! 'या' वेळेत राहणार हायवे बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ (मुंबई दिशेने) ओव्हर हेड गैन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने दिनांक २६.०८. २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या कारणास्तव दुपारी १२.०० ते ०२.०० या कालावधीत वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग (राष्ट्रीय महामार्ग ४८ ) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्ग मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.
        या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.
To Top