पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्षपदी रुपाली चव्हाण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
राख ता पुरंदर येथील रूपाली राजेंद्र चव्हाण यांची पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटाच्या "अध्यक्षपदी" निवड करण्यात आली.
       त्या निवडीचे पत्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष- प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष- डॉ. दिगंबर दुर्गाडे, कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा-अॅड. गौरी कुंजीर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त साहित्यप्रेमी मंडळ  सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्या वतीने पंचायत समिती बारामती विद्यमान सभापती- नीता फरांदे यांच्या शुभहस्ते रूपाली चव्हाण यांचा शाल, हार, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी निक्सा फायनान्स कंपनीचे (सीईओ) निखिल गायकवाड, रिया थोपटे, आदित्य पंडित, सिद्धार्थ वाघमारे, गणेश वाघमारे इ. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- प्रशिक्षक- प्रा. हनुमंत माने, सूत्रसंचालन- उत्कर्षा नाझीरकर व आभार-अॅड. गणेश ठोंबरे यांनी मानले.
To Top