सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे ता.भोर येथे स्वातंत्र्याच्या अमृतोस्तवानिमित्त सोमवार दि.१५ किशोरवयीन मुलींना आरोग्य व स्वसंरक्षण याचबरोबर महिलांना सुजाण पालकत्वाविषयीचे मार्गदर्शन राजगड पोलीस ठाणे महीला पोलीस प्रमिला निकम यांनी केले.
स्वसंरक्षण,आत्मविश्वास याविषयीचे स्वानुभवातून महत्व सांगत किशोरवयीन मुलींच्या मनात असलेल्या शंका, समस्या विषयी दिलखुलास चर्चा करून मायलेकिंमधील संवाद हा मैत्रीपूर्ण असावा याबाबत सांगण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शलाकाताई कोंडे, डॉ. पूजा खुटवड, केंद्र प्रमूख प्रभावती कोठावळे, सरपंच नाजूकाताई बारणे यांच्यासह महीला, किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंदाकिनी चाचर, सूत्रसंचालन हेमलता काळे, स्वागत ज्योती निगडे यांनी तर आभार प्रदर्शन पंढरीनाथ धावले यांनी केले.