सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दहीहंन्डीचा उत्सव मोठ्या ऊत्साहात पार पडला परंतु सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या वाई शहरातील सोनगीरवाडीतील मावळा प्रतिष्ठानने बांधलेल्या दहीहांडीवर ५५ हजार ५५५ रु बक्षीस ठेवून सर्वात उंच दहीहंडी बांधण्य़ाचा मान मिळविला, आमदार मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक चरण गायकवाड, माजी उपसभापती
मदन भोसले, नितीन जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक रवींद्र तेलतुंबडे लालासाहेब शिंगटे, आप्पासाहेब मालुसरे, रवी बोडके,बापू भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती,
कै.सागर मालुसरे यांच्य़ा स्प्रणार्थ ही दहीहंडी फोडण्य़ात येते,वाईकरांचे लक्ष वेधून घेत एक वेगळी परंपरा
जोपासण्य़ाचा प्रयत केला, त्य़ाला वाईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरवर्षी कोणताही अनुचित प्रकार न घडता वाई शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध पध्दतीने साजरा होत असतो , या वर्षी बारामती,
शिरवळ सिद्धनाथवाडी गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. वाई शहरातील सर्व दहीहंडी फोडण्य़ाचा मान
सिद्धनाथवाडीकरांना गेली पन्नास वर्षे आहे, गेल्य़ा काही वर्षां पसून तालुक्या बाहेरील गोविंदा पथके सहभाग नोंदवीत आहेत, रविवार पेठेतील ढोर गल्लीत गेल्य़ा अनेक वर्षां पासून किरवे ओढ्यात पाण्यात दहीहंडी बांधून आपली परंपरा याही वर्षी कायम ठेवली.