सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याचे चाललेले अस्तरीकरणाबाबत शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर असून अनेक गावांमधून हे काम थांबवण्यात आले आहे. अस्तरीकरण झाले तर शेतकरी देशोधडीला लागेल. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सदस्य कांचन निगडे यांनी याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन पाठवत काम थांबवण्याची विनंती केली आहे.
निगडे यांनी मा. अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हणटले आहे की, आपलं प्रत्येक काम हे दूरदृष्टी ठेऊन असतं ,कोणतं ही काम हाती घेतले की ते पूर्णत्वास नेहलं जातं, आपल्या कोणत्या ही निर्णयाकडे बोट दाखवणं तितकंसं सोप्प नसतं. निरा डावा कालवा काँक्रीटीकरण काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याचं वाचनात आलं अन शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळाले, कॅनॉल लगत पाझराच्या जिवावर करोडो रुपये कर्जे उभारून विहिरी खोदून एक ना अनेक लिफ्ट झालीत ,जे पुरंदर, बारामती च्या दुष्काळी गावांना तारणहार बनलं, अनेक दुष्काळी गावांच्या पाणी पुरवठा स्कीम या कॅनॉल लगत विहिरी खोदून झालेल्या असताना कॅनॉल आटला तरी त्या विहिरी आटून जातात .
त्यामुळे जर सिमेंट काँक्रीट अस्तरीकरण झाल्यास एक थेंब सुद्धा पाणी पाझरणाऱ नाही पर्यायी कॅनॉल लगतच्या सर्व विहिरी कोरड्या पडून जातील ,आहाकार माजेल,दादा,लोक नाराज होतील,जे पारंपरिक आहे ते राहू द्या ना ? दुष्काळी जनतेला ताटाच्या कडेला सांडलेले खरकटे जगायला मदत करते आहे ते नैसर्गिक आहे ,त्यास कृत्रिम करू नका .
आपल्या ठिकाणी आपण जरूर बरोबर निर्णय घेतला असला तरी आम्हा दुष्काळी भागाच्या जनतेवर दादा अन्याय होईल . मोडून पडेल शेतकरी .त्यामुळे दादा,जरी टेंडर निघालं असलं,पैसे पडले असले तरी त्याचा उपयोग खोलीकरण करा,गाळ काढा,कडेची झाडे झुडपे काढा,हवं तर चोरून पाणी वापरणारावर अंकुश ठेवा परंतु,पाझरणाऱ्या पाण्यावर हा अघोरी उपाय नकोय.
आम्ही आपल्या नेतृत्वाखाली काम करतो आपल्या कर्तृत्व गरुड भरारीचा आम्हाला सदैव अभिमान वाटतो ,परंतु एखाद्या निर्णयावरून तुमच्याकडे कोणी बोट दाखवलं तर आम्हाला अपमानास्पद वाटतं, त्यामुळे जनतेचा रोष घेऊन बळजबरी नकोय. मोठं मन दाखवून या कामास स्थगिती घ्यावी हिच विनंती.