सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
शिक्षण हे आयुष्याची गुरुकिल्ली असून शिक्षणामुळे आयुष्य घडत असते.प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षणामुळे आयुष्याच्या वाटेवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल होते असे प्रतिपादन पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे ता.भोर येथील माजी विद्यार्थी राजेंद्र मांढरे यांनी सोमवार दि.१५ शाळेला वस्तू भेट देताना केले.
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे ता.भोर विद्यालय मागील ५० वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करीत आहे.या ज्ञान मंदिरात २० वर्षांपूर्वी शिक्षण घेवून स्वतःचे आयुष्य उभी करणाऱ्या २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकी जपत शाळेला १० पंखे भेट देवून सध्याच्या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सुजाता भालेराव ,सदानंद जाधव ,सुनिता कदम,रजनी पोतदार,सारिका गुरव,मधुसूदन मिर ,चंद्रकांत कुंभार तसेच माजी विद्यार्थी माजी सैनिक योगेश म्हस्के,स्मिता सुर्वे रूपाली थोपटे, विजय भरगुडे ,सचिन बढे, योगेश म्हस्के ,सुभाष जाधव ,नितीन म्हस्के उपस्थित होते.
COMMENTS